सोनाली नवांगुळ रोज नव्या वाढत्या आव्हानांना तोंड द्यायला तयार आहे, पण आपण समाज म्हणून तिला पूर्वग्रहांशिवाय, स्टिरिओटाईप्ड कोंदणांशिवाय, एक माणूस म्हणून स्वीकारायला तयार आहोत?
सोनालीचा जगण्याचा, लढण्याचा, लिहिण्याचा उत्साह पाहिला की, आपल्याला आपणच ‘अपंग’ तर नाही ना, अशी शंका मनात येते. ती तिच्या तब्येतीशी जुळवून घेता घेता समस्त मानवजातीशीच जुळवून घेण्याची मनीषा मनात बाळगून असते. तिचे लेखन, तिचे अनुवाद, तिच्या अनुवादाला ‘साहित्य अकादमी’चा मिळालेला पुरस्कार, हे सारे तिच्या उत्कट जगण्याचेच विविधरंगी आविष्कार आहेत. नवनव्या अनुभवांना सामोरे जाण्याचा आनंद सतत तिला लुटायचा असतो.......